नळदुर्ग , दि. 14 : श्री क्षेत्र मैलारपूर येथील श्री खंडोबाच्या मंदिरात 'तुळजापूर लाईव्ह' वार्षिक दिनदिर्शिकेचे प्रकाशन दि. 14 जानेवारी रोजी मकर संक्रातीच्या सणादिवशी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी खंडोबास दिनदर्शिका अर्पण करण्यात आली. या दिनदर्शिकेत आपल्या भागातील महत्त्वाच्या याञा , उर्स , यासह इतर माहिती समाविष्ट करण्यात आली आहे..त्यामुळे ही दिनदर्शिका लोकोपयोगी असल्याचे पञकार विलास येडगे यानी बोलताना सांगितले.
यावेळी भाजपाचे धिमाजी घुगे, पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, जेष्ठ नागरिक रघुनाथ नागणे, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे, मंदिराचे पुजारी अनंत ढेपे, ओम ढेपे, सुरेश मोकाशे, नागेश मोकाशे, अरूण मोकाशे आदिजण उपस्थित होते.