हन्नुर : नागराज गाढवे

अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील श्री बृहन्मठ होटगी संस्था संचलित श्री मल्लिकार्जुन प्रशालेत ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर हे होते. यावेळी सरपंच उमाकांत गाढवे  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी रोडगीकर आणि सरपंच उमाकांत गाडवे यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या कार्याची माहिती दिली प्रशालेत विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .यावेळी शालेय मुलांनी चित्तथरारक कसरती करून उपस्थितांची मने जिंकली .कार्यक्रमास ग्रामसेवक नागनाथ सोरेगाव लक्ष्मण शिवशेट्टी  श्रीशैल स्वामी शिवानंद औरसंगे अमोल जडगे अक्षय माने श्रीशैल कस्तुरे बंटी शिवशेट्टी राहुल उस्तूरगे दिलीप बनजगोळे यांच्यासह सर्व शिक्षक व गावातील प्रमुख नागरिक  उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रकाश गुरव    यानी केले तर आभार मुख्याध्यापक रेवणासिद्ध रोडागीकर यांनी   मानले.

 
Top