चिवरी : राजगुरू साखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथिल महालक्ष्मी करिअर अकॅडमी मोफत प्रशिक्षण केंद्रामध्ये संस्थापक अध्यक्ष माजी सैनिक विठ्ठल होगाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुलांनी प्रमुख पाहुण्यांना सैनिक पोलिस दलातील दिली जाणारी प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
या कार्यक्रमावेळी सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, मोतीराम चिमणे, सचिन बिराजदार, भारतीय सैन्य दल आपले कर्तव्य बजावत असणारे अंकुश कोरे, अंगणवाडी सेविका अनिता बिराजदार, उषाबाई नगदे, शिंदे, मेंढापुरे, सामाजिक कार्यकर्ते राजीव कचवाई, तलाठी डी एन गायकवाड, अरूण कोरे, धनराज मिटकरी, प्रभाकर हिमगिरे, आशा कार्यकर्त्या, राजश्री कांबळे,अर्चना राजमाने, आदीसह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.