नळदुर्ग :  दि.२५ : 
नगरपालिकेच्यावतीने शहरातील वडारवाडा जवळ तुळजापूर रोड लगत उभारलेल्या कचरा  डेपो इमारतीस जागोजागी तडे गेल्याचे आढळून आल्यानंतर तडे लपवण्यासाठी सिमेंट पुसण्याचा केविलवाणा प्रकार करण्यात आला आहे.


 नळदुर्ग नगरपालिकेने चौदाव्या वित्त आयोग योजनेअंतर्गत सन २०१८-१९ मध्ये सुमारे पन्नास लाख रूपये खर्चून तुळजापूर रोड लगत असलेल्या कचरा डेपो येथे कचरा विलगीकरण, प्रक्रिया करण्यासाठी एक एक्कर जागेमध्ये विविध नऊ ठिकाणी केलेल्या कामापैकी एका इमारतीमध्ये यंञसामग्री बसवण्यापूर्वीच या इमारतीच्या आनेक भागास तडे गेले.
 या ठिकाणी सिमेंट पुसून भेगा झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सिमेंट पुसल्यानंतरही भेगा पडल्या आहेत तर  आनेक ठिकाणी भेगा लपवण्याचे कामही अर्धवट केल्याचे दिसत आहे. 

तसेच बनवलेली गटारसुद्धा वापरापूर्वीच भेगा पडून ढासळत असल्याचे चिञ आहे.

 या ठिकाणी  सिमेंट काँक्रीट केलेल्या रस्त्यावरही  मोठ्या आकाराच्या भेगा पडल्या होत्या त्या ठिकाणी सिमेंट वाळू मिसळून लेप लावल्यानंतरही या लेपास तडे जावून भेगा पडल्या आहेत. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे इमारतीच्या पश्चिमेकडील बाजूला फक्त पाया बनवताना आडवा बीम बनवला नसल्याची तांत्रिक चुक झाल्यामुळे इमारत पायाहीन असल्याची दिसुन येत आहे.

याबाबत प्रशासनाकडुन इमारत असलेल्या परिसरात दगड फोडण्यासाठी ब्लास्टिंग होत आसल्यामुळे इमारतीस तडे जात आसल्याचे तकलादू कारण सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असला तरीही याच परिसरात महावितरणची एक इमारत, उपजिल्हा रूग्णालयात व डाँ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहाची इमारत आहे या तीन इमारतीस काही झाले नसताना फक्त कचरा डेपो येथील इमारतीस कसे तडे जात आहेत हा प्रश्न अनुत्तरीत राहत आहे. विशेष  बाब म्हणजे या ठिकाणी दगड फोडण्यसाठी ब्लास्टिंग केली जात नसून पाथरवटाकडून दगड फोडले जात आहेत. ब्लास्टींग होत नसल्याच्या दाव्यास स्थानिक नागरिकांनीही दुजोरा दिला आहे. याप्रकरणी नागरिकातुन 
कारवाईची मागणी होत  आहे.


 
Top