वागदरी, दि. २५ ,एस.के.गायकवाड

   रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले)चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे हे नुकतेच उस्मानाबाद दौऱ्यावर आले असतान  जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे त्यांचा बुके देवून स्वागत पर सत्कार केला. 

याप्रसंगी कार्यकर्त्यांशी चर्चा करताना राजाभाऊ सरवदे म्हणाले की, तरुणपणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील व ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.
   यावेळी नगरसेवक राणा बनसोडे, रिपाइंचे जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड शहराध्यक्ष उदयराज बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते स्वराज जानराव, मुकेश मोटे उपस्थित होते.
 
Top