अचलेर : जय गायकवाड

लोहारा तालुक्यातील अचलेर  येथील फिनिक्स फाऊंडेशन यांच्या तर्फे करियर मार्गदर्शन मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक चाव्हाण रामसिंग हे  होते .या करिअर मार्गदर्शन मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंजिनिअर अमर स्वामी तसेच इंजिनियर बसवराज पाटील , फिनिक्स फाऊंडेशनचे संचालक जगदीश सुरवसे सर , मुख्याध्यापक चव्हाण रामसिंग सर तसेच धनराज स्वामी यावेळी उपस्थित होते.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणिता पुजारी यांनी केले या करिअर मेळाव्यामध्ये सर्व युवक व युवतींना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व त्यांना योग्य तो मार्ग निवडण्यासाठी व त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठीतसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन झालेले बदल व त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न व मिळणाऱ्या नोकरीच्या संधी कोणकोणत्या आहेत याविषयी मार्गदर्शन व्हावे तसेच नवनवीन असणाऱ्या नोकरीच्या संधी याविषयी विचारमंथन करण्यासाठी अचलेर . येथे फिनिक्स फाउंडेशन असलेले यांच्या तर्फे हा करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता यावेळी मार्गदर्शक म्हणून इंजिनियर अमर स्वामी तसेच इंजिनियर बसवराज पाटील मुख्याध्यापक रामसिंग चव्हाण सर फिनिक्स फाऊंडेशनचे संचालक जगदीश सुरवसे सर यांनी या करिअर मार्गदर्शन मेळावा मध्ये सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

  विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अभ्यास करताना असणाऱ्या अनेक अडचणी तसेच यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध पैलूंचे तसेच नवीन करिअर निवडताना कोण -कोणत्या  मार्गाने मार्गक्रमण करीत रहावे , विद्यार्थ्यांना अभ्यास करताना वाटणारा मानसिक दडपण ,त्याचबरोबर पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा , विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनामध्ये  करायचे कर्तव्य याविषयी इंजिनीयर अमर स्वामी  व इंजिनिअर बसवराज पाटील यांनी यावेळी  सखोल असे मार्गदर्शन केले.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री कुनाळे व वैष्णवी उपासे यांनी केले . तर आभार प्रदर्शन अबूबकर पटेल यांनी केले..

 
Top