ताज्या घडामोडी


तुळजापूर,दि.२५: 
 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवार दि. 25 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर जगदे हे होते.  प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.शामकुमार डोईजोडे यांनी प्रास्ताविकेत राष्ट्रीय मतदार दिवस याचे महत्त्व सांगितले. 
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जगदे यांनी मतदान हा लोकशाहीतील पवित्र भाग आहे. लोकशाही टिकवायचे असेल तर प्रत्येकांनी जागृत होऊन मतदान करावे व इतरांनाही मतदान करण्यास भाग पाडावे तरच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय मतदार दिवसाचे सार्थक होईल असे विचार मांडले. शेवटी आभार उपप्राचार्य प्रा रवी मुदकना यांनी मानले. यावेळी प्रबंधिका सुजाता कोळी ,ज्येष्ठ प्राध्यापक डी एस पवार, सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक वर्ग व कर्मचारी उपस्थित होते. यासाठी प्रा. प्रसाद सुतार व प्रा.सचिन सगरे यांनी परिश्रम घेतले.


 
Top