भूम, दि.१२ :  येथील शंकरराव पाटील महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ.किशोर गव्हाणे यांना कर्नाटक राज्यातील विजापूर येथील डेक्कन इनव्हायरमेंटल रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२० चा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नुकताच ऑनलाईनद्वारे प्राप्त झाला आहे.

 या त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकृष्ण चंदनशिवे, संस्थेचे प्रतिनिधी प्रा.संतोष शिंदे यांच्या हस्ते डॉ.किशोर गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.गव्हाणेहे या महाविद्यालयात गेल्या २९ वर्षापासून इतिहास विषयाचे अध्यापन करीत आहेत. त्यांनी आजपर्यंत विविध राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, अधिवेशने, कार्यशाळा व चर्चासत्रात उत्कृष्ट सहभाग नोंदवून विविध संशोधन पेपरचे वाचन केले आहे. 

त्यांनी १३ ग्रंथांचे लेखन केले असून मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड व औरंगाबाद विद्यापीठाच्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमात त्यांची संदर्भ ग्रंथ म्हणून पुस्तके आहेत. गव्हाणे हे सध्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या त्यांच्या यशाबद्दल प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
 
Top