तुळजापूर ,दि.२१: शिरगापूर ता. तुळजापूर येथिल रहिवासी व जामखेड येथील महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक गोपाल मारूती जाधव यांना इंग्रजी विषयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएचडी जाहीर झाली.
"रेसिझम इन द सिलेक्ट नाव्हेल्स ऑफ नदिनी गोरडीमेर" हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या लोकांनी काळ्या लोकांना कशा पध्दतीने वागणूक दिली, याचा अभ्यास जाधव यांनी प्रस्तुत संशोधनात केला आहे. जाधव यांना अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. अनिता मुदकण्णा यांनी मार्गदर्शन केले. मुदकण्णा यांचे जाधव हे पहिले संशोधित विद्यार्थी ठरले आहेत.
जाधव यांच्या यशाबद्दल
महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख एस.बी.कदम, शानू पटेल हायस्कूल पुणे येथील प्राचार्य महादेव जाधव, केशव जाधव आदींनी अभिनंदन केले.