नळदुर्ग,दि.२१: एस.के.गायकवाड :

 इंजिनिअरींगसह अन्य व्यवसाय आभ्यासक्रमासाठी प्रवेशाची शेवटची तारीख असल्याने व जातप्रमाणपत्र पडताळणी अनिवार्य असल्याने जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उस्मानाबाद येथील जात प्रमाणपत्र पडताळी कार्यालयात विद्यार्थ्यांची एकच गर्दी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. 

कार्यालयांच्या दिरंगाई व अनागोंदी कारभारामुळे या कार्यालयात ही गर्दी झाल्याची कुजबूज  ऐकावयास मिळाली.

    जिल्हा जात प्रमाणपत्र
पडताळणी समिती उस्मानाबादचे अध्यक्ष डी.एल.सुळ यांनी दिवसभर आपले कर्तव्य बजावत अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करत नियमाप्रमाणे त्रुटींची पुर्तता करून जातवैधता प्रमाणपत्र दिल्याने विविध शाखांमध्ये त्यांनी निवडलेल्या पदवी व पदवीका आभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यने विद्यार्थ्यी समाधान व्यक्त करत बाहेर पडताना दिसत होते.

   हे जरी खरे असले तरी जात प्रमाणपत्र पडताळणी उस्मानाबाद जिल्ह्या कार्यालयात सावळा गोंधळ दिसून आला.ज्यांनी नेता कार्यकर्ता म्हणून या कार्यालयातील कर्मचाऱ्यास आपले संबंध प्रस्थापित केलेले आहेत .त्या कार्यकर्त्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या नात्यातील अर्जदार यांच्या फाईल खालीवर करून आपले काम साधण्यासाठीची त्यांची एकच धावपळ यावेळी दिसून आली. त्यामुळे सर्व कागदपत्रे जोडलेले असून देखील जे रांगेत थांबले ते रांगेतच थांबले.त्यांच्या फाईल्सचे  काम चालूवर आहे. लाँगिंग होत आहे. तुम्ही बाहेर था़ंबा असे म्हणून त्यांना बाहेर काढणे व पुढाऱ्यांना आतमध्ये घेणे असा सावळागोंधळ उडाल्याने कोणाचा नंबर कधी हेच समजयला मार्ग नव्हता .शिवाय रक्त नात्यातील पुरावा जोडून वंशावळ सिद्ध केले असले तरी ज्याचे वैद्य प्रमाणपत्र जोडले गेले आहे. त्याची काही हरकत नाही म्हणून जाहीर प्रसिद्ध करण्यासाठीची त्रुटी काढणे म्हणजे पुन्हा पंधरा दिवस जात वैधताप्रमाणपत्र मिळसाठी प्रतिक्षा करणे होय. या अटीमुळे विद्यार्थ्यांची अँडमिशनची वेळ निघून जाते. त्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होते. तेंव्हा रक्त नात्यातील जातवैधता प्रमाणपत्रा सोबत व त्याचे शपथ पत्र जोडल्यास जाहीर प्रसिद्धीकरण करण्याची गरज नाही. तरी जाहीर प्रसिद्धीकरणाची अट रद्द करावी अशी मागणी या प्रसंगी अनेकांनी केली आहे.
  वेळीच संबंधित कार्यालयाने 
जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव मिळाल्याबरोबर ते  तपाासून ताबडतोब वैधता प्रमाणपत्र दिल्यास एकाच दिवशी आशी गर्दी होणार नाही. शिवाय वेळेत जात वैधता प्रमाणत्र मिळालाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तरी शासनाने याकडे जाणिवपुर्वक लक्ष द्यावे आशी मागीणी  पालक व नागरिकातुन  होते आहे.
 
Top