तुळजापूर, दि. २५ :
 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वत्तीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुर्व दिनी संपुर्ण राज्यात "संविधान सरनामा रॅलीचे" जिल्हा,शहर,तालुकास्तरावर आयोजन करण्यात आले होते.    

       राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल  गव्हाणे, मराठवाड़ा विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम,  विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, तालुकाध्यक्ष रोहित चव्हाण, समर्थ पैलवान, शहराध्यक्ष आदित्य शेटे,  यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज  चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असे नियोजन करण्यात आले होते. 

पोलीस प्रशासनाच्या  कायदेशीर बाबी लक्षात घेऊन रॅली रद्द करून डॉ बाबासाहेब आंबेडकर  चौक येथे छोटेखानी "संविधान सभा" घेण्यात आली.

 यावेळी  तालुकाध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे   बबन गावडे लालासाहेब मगर, शाहूराज दिरगुळे, युवा नेते महेश चोपदार,  अल्पसंख्यक तालुकाध्यक्ष फिरोज  पठाण, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, व्यापार तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, शहराध्यक्ष नितिन रोचकरी, तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे,   युवा नेते विकी घुगे, अनमोल शिंदे, केतन क्षीरसागर, सचिन माळगे, रणजित पलंगे,  हरी खुरुद,  मयूर दराडे, आंगुले विशाल पोपळे, वैभव शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top