अचलेर : जय गायकवाड
लोहारा तालुक्यातील मौजे आष्टा (कासार)येथील रामचंद्र साधू गायकवाड हे भारतीय सैन्यातून ३१ डिसेंबर २०२० रोजी सेवानिवृत्त झाले.त्यांनी केलेल्या देशसेवेचा गौरव म्हणून आपल्या गावातील लाडक्या सुपुत्राचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भीमनगर आष्टा (कासार) यांच्या वतीने दिनांक २६-१-२०२१ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.
रामचंद्र गायकवाड हे भारतीय सैन्यातील महार रेजिमेंट मध्ये हवालदार पदावरून निवृत्त झाले.तब्बल २६ वर्षे देशसेवा करून त्यांची सेवानिवृत्ती झाल्याने या लाडक्या सुपुत्राची मिरवणूक काढून आनंद साजरा केला.
देशसेवा करून आलेल्या आपल्या या जवानाचे गावकऱ्यांनी ठिकठिकाणी हार,तुरे,शाल,श्रीफळ देऊन स्वागत केल्याने गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तसेच जल्लोष पहावयास मिळाला.
लुंबिनी बुद्धविहार आष्टा (कासार) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी "वीर जवान तुझे सलाम"हा नारा निनादला.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते..