नळदुर्ग , दि. 26 : मंगळवार दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ता नळदुर्ग येथिल ऐतिहासिक किल्ल्यात व शहरातील शाळा, महाविदयालय , नगरपरिषद कार्यालय, महावितरण कार्यालय , पोलिस ठाणे, चावडी चौकसह विविधे ठिकठिकाणी मान्यवराच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भुईकोट किल्ल्यावर ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ तुळजापूर तहसिलचे नायब तहसिलदार चंद्रकांत शिंदे, यांच्या हास्ते संपन्न झाला. यावेळी पत्रकार विलास येडगे , शिवाजी नाईक ,दादासाहेब बनसोडे, तलाठी टि.डी कदम , अशोक जगदाळे , नगरसेवक विनायक अहंकारी ,बसवराज धरणे, नितीन कासार , निरंजन राठोड ,माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, नवल जाधव ,भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकुर ,बंडु कसेकर ,गणेश मोरडे , सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, खय्युम कुरेशी , नागनाथ गवळी , किल्ला संगोपनार्थ घेतलेल्या युनिटी कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काझी याच्यासह प्रतिष्ठित नागरिक , पर्यंटक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रांरभी संविधान वाचन जयभिम वाघमारे यांनी केले.