नळदुर्ग , दि.२६ : 

राज्याचे  उर्जामंञी व महावितरणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मनसेने निवेदनाव्दारे  नळदुर्ग पोलिस ठाण्याचे  साहय्यक पोलिस निरीक्षक 
यांच्याकडे केली आहे.

निवेदना पुढे नमुद करण्यात आले आहे की, कोरोनामुळे महाराष्ट्रात दि. २२ मार्च ते ८ जून २०२० दरम्यान   कडक  टाळेबंदी होती, या काळात महावितरण कडून ना वीज मीटर रिडींग साठी प्रतिनिधी आले , ना वीज देयके वितरीत करण्यात आले, घरातच बंदिस्त झालेल्या जनतेला या कालवधीतल्या वीज वापरासाठी महावितरण कंपनीकडून अचानक वापरपेक्षा तिप्पट-चौपट रक्कमेची अवाजवी व भरमसाठ वीज बिल पाठवली गेली.

 या वीज बिलाचे आकडे इतके मोठे होते की ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसह शहरातील मध्यमवर्गीयांना ही भोवळ आली, कोरोनाच्या टाळेबंदीत व्यापार, उद्योग, बंद होऊन असंख्य लोक बेरोजगार झालेले आहेत, आणि अनेकांच्या पगारात २५ ते ५० टक्के कपात झाल्यामुळे उत्पनाचे स्रोत बंद झाले असताना विजबिलाची भरमसाठ रक्कम भरणे शक्य नाही, 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतरही राजकीय पक्षांनी याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री ना.  उध्दव ठाकरे  व ऊर्जामंत्री ना  नितिन राऊत यांच्याकडे तक्रारी मांडल्या, त्यानंतर ऊर्जामंत्री यांनी वीज बिल कपात करुन देण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले,परंतु वीज बिलासंदर्भात  नागरिकांना  झुलवत ठेवल्याचे आरोप मनसेने केला आहे. 

 शेवटी सर्व सामान्य नागरिकाना वीज पुरवठा खंडित करण्याच्या धमक्या देऊन  वीजबिल वसुल करीत असल्याचे नमुद करुन   ही केवळ राजकीय आश्वासनाची फसवणुक नाही,तर वीज कंपन्याशी संगनमत करून करण्यात आलेली जनतेची लूट आहे, 

यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता भयभीत झाली असून,प्रचंड मानसिक आघात व क्लेश पोहोचला आहे,याची सर्वस्वी जबाबदारी राज्याचे ऊर्जामंत्री , महावितरण कंपनीचे  आधिकारी  यांच्या विरोधात फसवणूक व मानसिक आघात पोहचविण्याचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे साहय्यक  पोलीस निरीक्षक  यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे . 

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष  प्रशांत नवगिरे ,  जिल्हा सचिव  ज्योतीबा येडगे, तालुकाध्यक्ष  मल्लिकार्जुन कुंभार,  ॲड.मतीन बाडेवाले, शहराध्यक्ष  आलिम शेख, शहर सचिव  प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष  रमेश घोडके, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या स्वाक्ष-या आहेत, यावेळी निखिल येडगे,आवेज इनामदार, संदीप वैद्य आदी उपस्थित होते.
 
Top