अचलेर : जय गायकवाड
लोहारा तालुक्यातील अचलेर येथे मकर संक्रांत सनाचे औचित्य साधून सर्व महिलांनी एकत्र येऊन मल्लिकार्जुन मंदिरातील सभागृहात तसेच भीमनगर मधील सौ.लक्ष्मीबाई सदानंद कांबळे यांच्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम घेतला.
प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत.जुन्या रुढी परंपरा या केंव्हाच बंद झाल्यात त्यात गुरफटून न राहता आपणही सन्मानाने जगू लागलो आहोत. शिवाय या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येण्यास एक निम्मित ही होते.
मल्लिकार्जुन मंदिरातील सभागृहात तसेच लक्ष्मीबाई कांबळे यांच्या घरी हा कार्यक्रम घेण्यात आला.प्रत्येक महिला सर्वांच्या घरी जाण्यापेक्षा सर्वजण एकत्र जमले तर गोडी,प्रेम,स्नेह आणखी वाढते हा शुद्ध हेतू ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे उपस्थित महिलांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व महिलांनी उखाणे घेऊन आपली ओळख करून दिली. तीळ गुळ घ्या गोड गोड बोला अश्या शुभेच्छा यावेळी उपस्थित महिलांनी एकमेकींना दिल्या. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.