वागदरी, दि.२७ ,एस.के.गायकवाड:

तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दीन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

   येथील जि.प.प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते .प्ररंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पुजन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिकरित्या वाचन करून मुख्याध्यापिका महादेवी जत्ते यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले.   
    
    येथील ग्रा.प. कार्यालयाच्या प्रागंणात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने  ध्वजारोहणाच्या  करण्यात आले . प्रारंभी विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच दत्ता सुरवसे, सर्व ग्रा.प..सदस्य, जेष्ठ कार्यकर्ते किसन पाटील, शिवाजी मिटकर , राजकुमार पवार ,सुरेशसिंग परिहार, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष फतेसिंग ठाकूर ,आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व ध्वज स्तंभाचे पुजन करुन संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .

     भिमनगर वागदरी येथील पंचशील बुध्द विहार येथे  सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, माजी सरपंच नागनाथ बनसोडे, ग्रामसेवक जी.आर.जमादार, मुख्याध्यापिका महादेवी जत्ते, ग्रा.सदस्या मुक्ताबाई वाघमारे आदींच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून व संविधानाचे वाचन करण्यात  आले.
  यावेळी रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, ग्रा.प.सदस्य महादेव बिराजदार, बकुलाबाई भोसले, कमलबाई धुमाळ, विद्या बिराजदार, सहशिक्षक किसन जावळे, तानाजी लोहार, सहशिक्षीका आरती साखरेच,एस.एस.सागळे,एम.आर.घडके साखरे पंचशील बुद्ध विहार कमिटीचे महादेव वाघमारे, सुर्यकांत वाघमारे, भारत वाघमारे, सहदेव वाघमारे,  यासह महिला, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top