वागदरी, दि. २७ , एस.के.गायकवाड

 प्रजासत्ताक दिनाचे  औचित्य साधून शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे रिपाइं ( आठवले ) च्यावतीने ज्यानी आपले संपूर्ण जीवन पक्षाच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी घालवले व आज देखील काम करत आहेत ,अशा कार्यकत्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने कार्यकर्ता सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन  करण्यात आला होते.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ हे होते, तर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे,  रासपा जिल्हाध्यक्ष आश्रुबा कोळेकर, रिपाइंचे प्रदेश सचिव संजय बनसोडे ,आदी मान्यवर उपस्थितीत होते. 

यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हयातील १०१ कार्यकर्त्यांचा ट्रॉफी व सम्मानपत्र देवून गौरव करण्यात आला . 

  यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांनी पँथरच्या चळवळीमध्ये अनेक संकटाचा सामना करुन अन्याय , अत्याचाराच्या विरोधात संघर्ष उभा करून जिल्ह्यामध्ये पँथरच्या गाव तेथे शाखा स्थापन केल्या.  संघटना बांधणी केली .अनेक दलितावरील अन्याय , अत्याचाराला वाचा फोडली , त्यामध्ये नामांतर लढा , रिडल्स इन इंदूझम , इंदू मिल अशा अनेक प्रश्नांवरती व जिल्हयातील गायरान जमीन , शिष्यवृत्ती योजना, यावरती त्यांनी मार्गदर्शन करुन  युवकांना पक्ष बांधणीसाठी आव्हान केले.

 प्रदेश सचिव संजय बनसोडे यांनी आपल्या मनोगतात बोलताना म्हणाले को , तरूणपणी पँथरच्या चळवळी मध्ये जेल मध्ये गेलो. तरी पँथरची चळवळ सोडली नाही, यामुळे आज माझा गौरव होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तालुकाध्यक्ष- भालचंद्र कठारे यांनी केले.खास बाब म्हणून दि .२२ व २३ फेब्रुवारी १ ९ ४१ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कसबे तडवळा येथे येऊन महार - मांग वतनदार परिषद घेतली याची आठवण करून देत असताना ज्या शाळेत बाबासाहेब मुक्कामी होते. त्या शाळेला महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय स्मारक घोषित करुन देखील स्मारकाचे काम चालू झालेले नाही.

 नामांतर लढ्यात जे शहीद झाले त्यांच्या आठवणी ताज्या करुन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास आनंद पंडगाळे , रविराज पाटील , भागवत शिंदे , बंडू बनसोडे , तानाजी कदम , अमोल शिंदे , विद्यानंद बनसोडे , तानाजी गंगावणे , सचिन शिंगाडे , संपत जानराव , उदयराज बनसोडे , स्वरान जानराव , मुकेश मोटे , फकीरा सुरवसे , बाबासाहेब मस्के , मुन्ना ओहाळ , बाबासाहेब बनसोडे , एस.के. गायकवाड  , रवि कांबळे , बालाजी माळाळे , गौतम कांबळे , महेंद्र जेटीथोर , तुकाराम वाघमारे , दिलीप गायकवाड , जयसिंग भालेराव , वंदू भालेराव , आकाश इंगळे , राजेंद्र शिंदे,तसेच यावेळी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती २०२१ चे अध्यक्ष अशिष मोदाणी , सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे , संग्राम बनसोडे , भिमशक्ती संघटनेचे मेसा जानराव यांच्यासह अनेक जिल्ह्यातील रिपांईचे पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जुन उपस्थित होते.
    शेवटी सर्वाचे आभार  जिल्हा संघटक  सोमनाथ गायकवाड  यांनी मानले.
 
Top