उमरगा, दि. 06 : श्रीमती शालीनी फत्तेपुरे, रा. नारंगवाडी, ता. उमरगा यांनी महादु लोहार यांना सावकारी कर्ज देउन त्यांची 1.20 हेक्टर शेतजमीन स्वत: खरेदी केली आहे. अशा मजकुराची तक्रार महादु लोहार यांनी सहकार अधिकारी, श्रेणी- 2 सहायक निबंधक सहकारी संस्था, उमरगा यांच्याकडे केली होती. या अर्ज चौकशीत अवैध सावकारी झाल्याचा सकृतदर्शनी पुरावा दिसत आहे. अशा मजकुराच्या सहकार अधिकारी- श्री अजित जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम कलम- 39 अंतर्गत गुन्हा आज दि. 06.01.2021 रोजी नोंदवला आहे.

 
Top