नळदुर्ग, दि. 06 : दर्पण दिनाचे औचित्य साधुन बुधवार दि. 6 जानेवारी रोजी नळदुर्ग शहरातील विविध मान्यवरांकडून पत्रकारावर शुभेच्छांचा वर्षाव करुन भव्य सत्कार करण्यात आला. डॉ. आंबेडकर इंग्लीश स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जि.प. प्रशाला, लोकमंगल मल्टिस्टेट को.ऑप. सोसायटी, तुळजापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, धरणे बायोफ्युल आदींच्यावतीने पत्रकारांचा गौरव करण्यात आला.

पत्रकार सुहास येडगे, विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, शिवाजी नाईक, भगवंत सुरवसे, दादासाहेब बनसोडे, लतीफ शेख, आयुब शेख, दिपक जगदाळे, पांडुरंग पोळे, सुनिल गव्हाणे, इरफान काझी, विशाल डुकरे यांचा विविध ठिकाणी पत्रकार दिनानिमित्‍त सत्कार करण्यात आला. 

धरणे बायोफ्युल व पृथ्वी केअर प्रा.लि. चे मुख्य प्रवर्तक सचिन धरणे, नगरसेवक बसवराज धरणे, ॲड. धनंजय धरणे आदींच्यावतीने दर्पण दिनानिमित्त लेखनी, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला. यावेळी सुत्रसंचलन नगरसेवक विनायक अहंकारी यांनी तर आभार सचिन धरणे यांनी मानले.

तसेच येथील डॉ. आंबेडकर इंग्लीश स्कूलच्यावतीने फेटा बांधून पुष्पगुच्छ व लेखनी देवून गौरविण्यात आला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी व ऐतिहासिक वृत्तपत्राबद्दलची माहिती इंग्रजी भाषेतून सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मारुती खारवे, सहशिक्षक मधुकर जायभाय, यशवंत डोंबाळे, श्रीकांत सावंत यांच्यासह विद्यार्थी, शिक्षकत्तेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सम्यक खारवे यांनी केले. तर आभार कैफ शेख यांनी मानले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेही पत्रकारांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. मनसेचे जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, जनहित कक्ष व विधी विभाग तालुकाध्यक्ष ॲड. मतीन बाडेवाले, शहराध्यक्ष अलीम शेख, ‍शहर चिटणीस प्रमोद कुलकर्णी, मनविसे शहराध्यक्ष सुरज चव्हाण, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके आदीजण उपस्थित होते.

तसेच जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत केंद्रीय मुख्याध्यापक दत्तात्रय आलुरे यांच्या हस्ते पत्रकारांचा पुष्पगुच्छ व लेखनी देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सहशिक्षक बिलाल सौदागर यांनी केले. यावेळी सहशिक्षिका श्रीमती वंदना चौधरी, सुरेखा मोरे, सय्यद मोयोद्दीन, श्रीमती ललीता आलुरे, श्रीमती सुंदर भालकाटे आदीजण उपस्थित होते.

त्याचबरोबर लोकमंगल मल्ट्रिस्टेट को.ऑप. सोसायटी शाखा नळदुर्ग येथे मॅनेजर मारुती काळे यांच्या हस्ते पत्रकारांचा गौरव करण्यात आला.  यावेळी कैलास घाटे, आकांक्षा पाटील आदीजण उपस्थित होते.

तसेच तुळजापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सहशिक्षक प्रशांत मिटकर यांच्या हस्ते पत्रकारांचा गौरव करण्यात आला. यावेळी सहशिक्षक मल्लिनाथ सुरवसे, हरिदास सुरवसे, सुरज शेख, वाहतुक नियंत्रक दिपक डुकरे, अमर भाळे आदीजण उपस्थित होते. 

त्याचबरोबर येथील जिल्हा परिषद प्रशालेत मुख्याध्यापक एस.एल. जाधवर यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहशिक्षक एस.एस. जाधव, बी.एच. सनगुंदी, श्रीमती के.वाय. मदारसे, झेड.एस. हन्नुरे, ए.झेड. शेख, ए.बी. कुलकर्णी, पाटील व्ही.डी,  ए.ए. लोहार, अफजल शेख आदीजण उपस्थित होते.


 
Top