अचलेर : जय गायकवाड

क्रांतीज्योती साविञीमाई फुले- व ज्यांच्या कुशीतून स्वराज्याच देखणं स्वप्न निर्माण झालं त्या जिजाऊमॉसाहेब जन्मोत्सवानिमित्य उमरगा येथे आज दि.६-१-२०२१ रोजी विधीज्ञ मंडळाच्या सदस्या,शिव,फुले,शाहु,आंबेडकर विचाराच्या अभ्यासक अँड. शिल्पाताई सुरवसे-बनसोडे यांचा जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


बहुजन समाजातील  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा कोरोना या रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी  त्यांच्या घरी जावून हा सत्कार समारंभ करण्यात आला.यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा शिवमती रेखाताई पवार,जिजाऊ ब्रिगेड तालुका कार्याध्यक्षा शिवमती राऊताई भोसले,कदेर जिजाऊ ब्रिगेड शाखाध्यक्षा शिवमती वैशालीताई जाधव,शिवमती मिनाक्षीताई जाधव,शिवमती सुचिता पांचाळ , मराठा सेवा संघाचे विभागीय सचिव भास्कर वैराळे आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

 
Top