उस्मानाबाद, दि. 07 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हयामध्ये तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या तसेच तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी सामाजिक क्षेत्रात आणि तृतीय पंथियांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींनी, संस्थांनी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा समाज कल्याणचे सहायक आयुक्त बी.जी.अरवत यांनी केले आहे.

या समितीमध्ये सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी एक व्यक्ती आणि तृतीयपंथीयासाठी कार्य करणाऱ्या नामवंत संस्थातील दोन तृतीयपंथी व्यक्ती (त्यापैकी किमान एक व्यक्ती Trans Women असणे आवश्यक) आहे.या समितीमध्ये कार्य करण्यासाठी इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभाग,उस्मानाबाद यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top