तुळजापूर, दि. 01 : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रतेज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुलचंद व्यवहारे यांना नगर येथे उजेडाचे मानकरी हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल उस्मानाबाद नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे यांनी व्यवहारे यांचा सत्कार केला.

यावेळी लेखा व कार्यक्रम सहाय्यक विकास कुलकर्णी, नवनिर्मिती महिला संस्थांच्या अध्यक्ष मीनाताई सोमाजी कदम, एकता फांऊडेशन उस्मानाबादचे अध्यक्ष अभिलाष लोमटे, तुलशी पतसंस्थेच्या चेअरमन सौ. नंदाताई पुनगुडे, सौ. अनिता तोडकर, रवीकांत सुरवसे आदिजण उपस्थित होते.


 
Top