तुळजापूर, दि. 01 : तुळजापूर तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची गुरुवारी छाननी करण्यात आली असून यात 4 जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. आता 1 हजार 214 जणांचे उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. दरम्यान, 4 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतरच ग्रामपंचायत निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

तुळजापूर तालुक्यातील अणदूर, मंगरूळ,  तामलवाडी सह ५३ ग्रामपंचायत निवडणूकीचा सार्वत्रिक निवडणुकीचा धुराळा उडाला असून उमेदवारी अर्जाचा छाननीत  अपूर्या कागद पत्रा अभावी ४ उमेदवारी अर्ज बाद ठरले. यामध्ये अणदूर, जळकोट, तिर्थ खु व सिंदफळ येथील प्रत्येकी एक उमेदवारी अर्जाचा समावेश आहे. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवशी म्हणजे बुधवार दि. ३० डिसेंबर रोजी  ९६४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तर  मंगळवारी  १८०, सोमवारी ७०  अर्ज तर गुरुवारी ४ असे एकूण १२१८  उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.

 
Top