उस्मानाबाद,दि . २६ :
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंर्तगत लोहारा तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सास्तूरच्या संयुक्त विद्यमाने सास्तूर येथील उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या 14 महिला स्वयंसहाय्यता गटांना 16 लाख रुपये बँक कर्ज वाटप करण्यात आले.
नुकतेच लोहारा पंचायत समिती येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला.
महिला ह्या स्वयंमपूर्ण झाल्या आहेत आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. या कर्जाच्या माध्यमातून महिलांनी जास्तीत जास्त शाश्वत उपजीविकेची साधने उभी करावीत. आपल्या आर्थिक उत्पन्नात वाढ करावी जेणे करून बँक कर्जाची वेळेत परतफेड करता येईल,असे मत डॉ.फड यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी फड यांच्या हस्ते उपस्थित गटातील सदस्यांना कर्ज वाटप करण्यात आले.यावेळी महिलांनी कर्जाचा योग्य प्रकारे विनियोग करावा यातून नवीन व्यवसाया उभे करून बँकेच्या कर्जाची वेळेत परतफेड करावी, असे आवाहन फड यांनी यावेळी केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितिन दाताळ, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमिले, गटविकास अधिकारी सोपान अकेले, महाराष्ट्र ग्रामीण बँक सास्तुर चे शाखा व्यवस्थापक सचिन डाके यांची उपस्थिती होती. तसेच लोहारा पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन कटकदौंड प्रणिता, प्रभाग समन्वयक प्रीतम बनसोडे, बँक सखी मालन कांबळे, सीआरपी रेशमा कादरी तसेच उमेद चे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.