चिवरी, दि.२७ : राजगुरु साखरे
वसंत ऋतूची चाहूल लागताच नजरेला भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे, पळस सध्या बालाघाटच्या डोंगररांगा माळावर भरला आहे. यामुळे रानात आत्तापासूनच रंग उत्सवाला सुरुवात झाली आहे, हिंदू संस्कृती मधील होळी सणानिमित्त पळस फुलापासून रंगाची उधळण केली जाते.

 पळस सध्या चहूकडे मोठ्या प्रमाणात बहरला आहे, लाल केशरी आणि किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी भरलेली पळसाची झाडे सध्या सर्वच ठिकाणी वाटसरूंचे  लक्ष वेधून घेत आहे. उन्हाळ्यात सर्व झाडांची स्थिती चिंताजनक असते, नेमकी पळसाला मात्र लालजर्द फुले लागलेले असतात. या झाडाला पाने नसतात, नुसत्या फुलांची जणू काय वसंत ऋतुचे आगमन होताच उन्हाळ्याची स्वागत करायला पळस फुलेला दिसतो . 

त्यानंतर काही दिवसातच नवीन तजेलदार पोपटी ,हिरवीगार पाने त्याला लागतात. त्याच्या ग्रामीण भागात विवाह समारंभात जेवणासाठी पत्रावळी म्हणून वापर करतात या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडाला पाणी कुणी घालत नाही, माळरानावर शेतीच्या बांधावर, अत्यल्प पाण्याच्या ठिकाणी ही झाडे आपोआप येतात. 

पळसाच्या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे, मात्र अलीकडच्या काळात कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडत चाललेली दिसून येत आहे.
 
Top