काटी, दि. २७ :
तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खुर्द) येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळंब- उस्मानाबाद विधानसभेचे आमदार कैलास पाटील यांचा वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोरोनामुळे सामाजिक अंतराचे पालन करीत ठिकठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, बालाजी चुंगे, सरपंच गिता वाघमोडे, उपसरपंच विजय जाधव, ग्रा.पं.सदस्य संग्राम पांढरे, मोहन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.