काटी ,दि.२८: उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे रविवार रोजी बसस्थानक शेजारी शिवजयंती निमित्त व भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने 81 दात्यानी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.
या रक्तदान शिबिरात सोमनाथ तानवडे व सौ.शशिकला तानवडे या पती, पत्नीनेही सहभाग नोंदवला .
यंदा कोरोनामुळे भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांनी वाढदिवस न करता सामाजिक बांधिलकी जपत रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर व निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने येथील बोबडे मित्र परिवार , शिवजन्मोत्सव तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर तोडकरी यांच्या हस्ते आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, नेताजी कदम,श्रीधर पाटील, सचिन मगर, चेअरमन विनायक करंडे, माजी उपसभापती विलास डोलारे, शंकर शिंदे, बाळासाहेब शिंदे, प्रमोद माने,संजय लिंगफोडे,किरण डोलारे, बाळासाहेब डोके,अमर मगर, अविनाश माने, सोमनाथ तानवडे, शशिकला तानवडे, प्रशांत लिंगफोडे, राजेंद्र डोलारे, विश्वनाथ राऊत, राजाभाऊ फंड, मनोज फंड, हणमंत फंड,अमोल माने, दयानंद भडंगे, बाळकृष्ण गवळी, शुभम बोबडे, ओमराजे बोबडे, कृष्णाथ बोबडे, रमेश चौगुले, रणजीत भालेकर, सुदर्शन भालेकर, गणेश फंड, काकाराज फंड, सौदागर निकम, नागेश कुंभार, नाना कुंभार,झाकिर शेख,राजेश धावणे, धनाजी भालेकर, तायाप्पा ताटे, धर्मराज बोबडे, अमोल फंड, दमाणी ब्लड बॅंकेचे अभय कुलकर्णी,दिपा मलपेदी,ममता मेहता, पल्लवी धावडे, महेश शिंदे, रवि वीर, डि.एस.जाधव, सुधीर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.