तुळजापूर, दि.  २८ :
तुळजापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू नये म्हणून नगर परिषदेच्या  वतीने सर्वांना बंधनकारक करण्यात आला आहे. मास्क न घातल्यास दंड वसुली करण्याचे सत्र नगरपरिषदेने चालू केले आहे.

शहर आणि परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने कर्मचारी , मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी रविवारी दिवसभर शहरातील बाजारपेठेमध्ये व्यापारी वर्गाकडून आणि शहरवासीयाकडून मास्क घालण्याबाबत दुर्लक्ष करीत असल्याची बाब नगरपरिषदेच्या लक्षात आल्यानंतर मुख्याधिकारी लोकरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी पावती पुस्तकासह दंड वसुलीचे सत्र सकाळ पासून सुरु केले.

कोरोना संसर्ग वाढत चालल्याचे चित्र समोर आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून प्रशासनाकडे यासंदर्भात होणारी विचारणा तसेच तुळजाभवानी देवीचे मंदिर काही प्रमाणात सुरू असून त्यामुळे व्यापाऱ्यांचे व्यवस्थित अर्थकारण होत असताना व्यापारी आणि ग्राहक तसेच तुळजापूर शहरवासीय बाहेरगावाहून येणारे भाविक भक्तानी मास्क वापरला पाहिजे, म्हणजे संसर्ग अधिक वाढणार नाही या भूमिकेने मुख्याधिकारी , कर्मचारी यानी मास्कची सक्ती करताना दिसुन आले. .
 मास्क न घातलेल्या व्यक्तींना रस्त्यावर अडवून दंड वसुली करीत होते, न.प .च्या अधिक्षक वैभव पाठक व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

संसर्गाची भीती सर्वांना असताना मास्क वापरण्यासाठी व्यापारी वर्गाने दुर्लक्ष करू नये, पालिकेचे पथक आल्यानंतर खिशातील रुमाल अथवा मास्क लावणे योग्य नाही. आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वांनी पूर्णवेळ मास्क लावावा असे आवाहन मुख्य अधिकारी आशिष लोकरे यांनी केलेले आहे.
 
Top