नळदुर्ग , दि.२७ ,
नळदुर्ग शहरातील मनसेच्या माजी कार्यकर्त्यांच्यावतीने मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा करण्यात आला.यानिमित्त शिक्षक व पञकार यांचा गौरव करण्यात आला.
मराठी शिक्षक जितेंद्र मोरखंडीकर, राजेंद्र काशिद, पञकार विलास येडगे, तानाजी जाधव , शिवाजी नाईक, भगवंत सुरवसे, सुनिल गव्हाणे, उत्तम बणजगोळे सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, उत्तम वक्ता तथा नगरसेवक विनायक अहंकारी, न.प. कर्मचारी नवनाथ होनराव आदीचा लेखनी व पुष्पगुच्छ देवुन सत्ककार करण्यात आला.
छञपती शिवाजी महाराज व सर्व थोर व्यक्तीसह संत , कवी, लेखक याच्यांमुळे मराठी भाषा जिवंत असल्याचे सहशिक्षक मोरखंडीकर यांनी सांगुन मराठी भाषेबद्दल सविस्तर माहिती दिली.
मनसेचे माजी कार्यकर्ते शिवाजी सुरवसे, अरुण जाधव, दिलीप शंकरशेट्टी, शिरीष डुकरे आदीनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. सुञसंचालन व आभार दिलीप शंकरशेट्टी यानी मानले.