वागदरी, दि.२८ :
माझा गाव ,सुंदर गाव, स्वच्छ गाव हा संकल्प करीत खुदावाडी ता.तुळजापूर येथे माझा गाव सुंदर गाव या आभियानाला सुरुवात करण्यात आली असुन या मोहीमेस ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळला आहे .
खुदावाडी ग्रामस्थानी 2001 साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून राज्यात आदर्श कामगिरी बजावली होती .
या अभियानाचा धागा धरून ग्रामस्थानी " माझा गाव सुंदर गाव" या मोहिमेस सुरुवात करून गाव स्वच्छतेकडे नेण्याचा एकच ध्यास सुरू केला आहे .
जि.प.उस्मानाबाद अंतर्गत जिल्हाभर चालू असलेल्या माझा गाव सुंदर गाव या आभियानाला प्रतिसाद देत खुदावाडी येथील सरपंच शरद नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली या आभियानाला सुरुवात केली आहे .
या मोहिमेत सरपंच शरद नरवडे , सामाजिक कार्यकर्ते संभाजी कापसे , शालेय व्यवस्थापन कमिटीचे संगाप्पा चिंचोले , ग्रामस्थ , महिला , युवक व शासनाच्या उमेद आभियाना अंतर्गत असलेल्या बचत गटातील महिला , अशा कार्यकर्त्या देखील सहभागी झाले होते .