मुरुम : येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मातोश्री श्रीमती गंगाबाई माधवराव पाटील यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी अल्पशा आजाराने सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात गुरुवारी (ता.४) रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्यावरती मुरूम,ता. उमरगा येथे शुक्रवार (ता.५) रोजी ठीक दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

त्यांच्या पश्चात्य दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या त्या मातोश्री होत. तसेच उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांच्या त्या आजी होत.

 
Top