नळदुर्ग ,दि. ४ :
अणदुर ता.तुळजापूर येथील सामुहीक बलात्कार प्रकणातील अरोपीस तात्काळ अटक करुन सदर खटला जलद गती न्यायालयात चालवून त्यांना कडक शासन करण्यात यावे व पीडीत कुटूंबास संरक्षण दयावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) नळदुर्ग शाखेच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास लहाने यांना दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे येथे रिपाइंच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चौदा वर्षीय शालेय मुलीवर अणदुर मधील कांही नराधमांनी सामुहीक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सदर घटना ही मानवतेला काळीमा फासणारी असून या निंदनीय घटनेचा रिपाइंच्या वतीने जाहीर निषेध करुन या घटनेतील तीनही आरोपीस कडक शासन करण्याची मागणी रिपाइं नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने करण्यात आली.
या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, युवा जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे , रिपाइं तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, रिपाइं अल्पसंख्याक आघाडीचे बाशिद कुरेशी, नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे, चांगदेव रणे, विजय साखरे, सुरेश बनसोडे, राम बनसोडे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.