उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये
डेमो हाऊसचे भूमिपूजन
उस्मानाबाद,दि.03
महाआवास अभियानाअंतर्गत पंचायत समिती उस्मानाबाद येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल कसे असावे याबाबत माहिती होण्याकरिता डेमो हाऊसचे उदघाटन करण्यात आले.
पंचायत समितीच्या पार्कींग शेडच्या पश्चिम बाजुला 500 चौ.फुट जागेत डेमो हाऊसची आखणी करुन भूमिपूजन पंचायत समिती सभापती श्रीमती हेमा महेश चांदणे, गट विकास अधिकारी श्रीमती समृध्दी दिवाणे,पंचायत समिती सदस्य शाम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती मधील कर्मचारी उपस्थित होते.