तुळजापूर : सतीश महामुनी
श्री तुळजाभवानी मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज दरवाजा भाविकांसाठी सुरू करण्यात यावे व त्याठिकाणी अक्सेस पासची व्यवस्था करण्याची युवक नेते औदुंबर कदम , नगरसेवक तथा महिला व बाल कल्याण सभापती सौ. हेमा औदुंबर कदम यांनी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
याच मागणीचे निवेदन तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांना शिष्टमंडळाने दिले आहे.
निवेदनात नमुद केले आहे की, श्री तुळजाभवानी मंदिराच्या पाठिमागील बाजूचा छत्रपती शिवाजी महाराज दरवाज कोरोना काळात बंद करण्यात आले होते. तेव्हा पासुन ते आजतागायत आराधवाडी येथिल राहणा-या पुजारी नागरीक, व्यापा-यांची उपास मारीची वेळ आली आहे आज कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने श्री तुळजाभवानी मंदिराच्या पाठिमागील दरवाजा उघडण्यात यावा जेणेकरून आराधवाडी मार्ग येणा-या भाविकांची होणारी गैरसोय टाळावी व त्या भागातील पुजारी छोटे मोठे व्यापारी यांची उपासमार होणार नाही याची काळजी घ्यावी छत्रपती शिवाजी महाराज दरवाजा उघडून त्या ठिकाणी मोफत दर्शन पासची व्यवस्था करून भाविकिंची गैरसोय टाळावी असे नमूद केले आहे.
निवेदनावर मा.नगरसेवक औदुंबर कदम, अतुल टोले गोपाळ पवार सोमनाथ पवार राहूल पवार आण्णा इंगळे, योगेश माळी विकास मोटे गणेश पवार विष्णू मोटे महेश पवार दुर्गेश पवार नेताजी कदम प्रशांत पवार विनोद कदम प्रशांत भोसले बापु पवार आदिंसह पुजारी व्यापारी नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.