काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते दलित मित्र नंदू बनसोडे लिखित "नशा मुक्त होऊ चला" या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि. (31) रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मुंबईत संविधान बंगला बांद्रा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

याप्रसंगी बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की,सध्या समाजात  तरुणांच्या अंमली पदार्थ,गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून दलितमित्र नंदू बनसोडे यांचे समाजाप्रती असलेली आवड, काळजी या भावनेतून त्यांनी लिहिलेल्या  "नशा मुक्त होऊ चला" या पुस्तकाचे कौतुक करुन  समाजात सध्या भरकटलेल्या तरुणाईला स्वच्छंद समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी नशामुक्तीचा प्रचार व प्रसार करणे व  त्यासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

        यावेळी दलित मित्र नंदू बनसोडे, राजेंद्रकुमार सुरवसे, प्रभाकर हिंदळेकर, सौ.अनुसया बनसोडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top