अचलेर : जय गायकवाड

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा, बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्यशक्ती,एक आदर्श मातृत्व,माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त धम्मदिप तरुण मंडळाच्या वतीने लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विहारात माता रमाईच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी सामुदाईक त्रिसरण पंचशिल ग्रहण करण्यात आले. रमाईचा आदर्श प्रत्येक माता भगिनींनी आत्मसात करावा, आणि रमाई सारखे शीलवान, गुणवान व्हावे असे यावेळी पत्रकार जय गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.

यावेळी भिमनगर मधील बौद्ध उपासक-उपासिका,लहान बालक,उपस्थित होते..!!!

 
Top