उस्मानाबाद, दि.०७ :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्तव समिती लिंबोनी बाग तांबरी विभाग उस्मानाबाद च्या वतीने माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने अध्यक्षा अस्मिता कांबळे बोलत होत्या.
माँ जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले,तसेच माता रमाईनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना घडवले.आजच्या स्त्रियांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे असे विचार याप्रसंगी व्यक्त केले.
प्रथम माता रमाईच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी तांबरी विभाग मधील सावित्रीची लेक जिल्हा परिषद अध्यक्षा झाल्याने जयंती उत्सव समितीच्या वतीने महिलांच्या वतिने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ए.पी.आय पदी बढती मिळाल्या बद्दल राहुल इंगळे व न.प मनपा शिक्षक संघाच्या लातूर विभागीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याने अशोक शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.प्रशांत डावरे यांची सहाय्यक प्राध्यापक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे पदस्तापना झाल्याने यांचाही सत्कार करताना आला.
यावेळी राजेंद्र धावारे,धर्मराज माटे,
जयराज खुणे,प्रशांत शिंदे,अक्षय पाचपिंडे, रामलिंग सोनवणे,सोमनाथ गायकवाड, स्वामीराव चंदनशीवे ,ज्ञानेश्वर डावरे, गौरव धावारे व परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सूत्रसंचालन विजयमाला धावारे व आभार प्रियांका धावारे यांनी केले.