अचलेर : जय गायकवाड
लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इंग्रजीचे गाढे अभ्यासक सुभाष गेजगे हे तीस वर्षे,दहा महिने,दोन दिवस प्रामाणिक सेवा करून शासकीय नियमाने आपल्या शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले.
याचे औचित्य साधून प्रशालेच्या वतीने त्यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी अचलेर ग्रामपंचायत कार्यालयाचे माजी सरपंच सुभाष सोलंकर,आष्टा केंद्राचे केंद्र प्रमुख चव्हाण आर.एस.,माजी मुख्याध्यापक हन्नुरे डी.बी.माजी शिक्षक जाधव एफ.के.,चंदनशिवे आर.व्ही.,पाटील के.सी.,प्रशालेचे मुख्याध्यापक बेंडगे बी.डी.,पर्यवेक्षक येरोळकर यु.पी.,कन्या शाळा आलूर चे सहशिक्षक स्वामी आर.एस., गायकवाड सर,ग्राम पंचायत सदस्य अनंतसिंह बायस,सतीश वाघमारे,पिंटू घोडके,सदनशिल शेतकरी महादेवप्पा कदारे, शाळेचे माजी विद्यार्थी,सर्व पालक ,शिक्षणप्रेमी,पत्रकार,गेजगे परिवार,शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका,कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी गेजगे परिवाराच्या वतीने शाळेस साऊंड सिस्टीम भेट स्वरूपात देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालके एस.सी.यांनी केले तर आभार जमादार एफ.जी. यांनी मानले.