मुरूम शहरात पोलिओ लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामीण रुग्णालय व अंगणवाडी कर्मचारी बजावली उत्तम कामगिरी
मुरुम, दि.३१ : येथील डॉ.आंबेडकर वाचनालयात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.वसंत बाबरे, उपनगराध्यक्ष साधू गायकवाड यांच्या उपस्थितीत पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले.
रविवारी दि.३१ रोजी पोलिओ लसीकरणास मुरूम शहरात मोबाईल युनिटला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. ० ते ५ वयोगटातील अपेक्षित लाभार्थी २४१५ पैकी २२८० लाभार्थ्यांनी पोलिओ लसीकरणास प्रतिसाद दिला. शहरात एकूण ९४.८० टक्के लसीकरण पूर्ण झाले.
शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ.वसंत बाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १३ बुथ यामध्ये एक ट्रान्झिट टीम, एक मोबाईल युनिटसह ग्रामीण रुग्णालय कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांच्या सहाय्याने पोलिओ लसीकरण यशस्वी करण्यात आले. यामध्ये शहरातील आंबेडकर वाचनालय १४०, नूतन प्रशाला १९९, ज्ञानदान विद्यालय १२७, महादेव नगर १६६, कुंभार विहीर पाताळे घराशेजारी २०५, तलाठी कार्यालय २३७, किसान चौक २००, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय १२२, ग्रामीण रुग्णालय २२०, यशवंत नगर १००, लक्ष्मी मंदिर ९०, धनगर गल्ली १८१, लिगाडे प्लॉट १५७, ट्रान्झिट युनिट १०१ तर मोबाईल युनिट ३५ अशी बुथनिहाय एकूण २२८० बालकांनी पोलिओ लसीकरणाचा लाभ घेतला.
यावेळी शासनाचे नियमांचे पालन करत तोंडाला मास्क व सॅनिटायझरचाही वापर करण्यात आला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.