रेडा : संतोष भोसले         

 इंदापूर तालुक्यातील रेडा गावात ग्रामसेवक गेली एक ते दीड महिन्यापासून गावात फिरकले नसल्याने गावातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत पासून मिळणाऱ्या मूलभूत सुविधांच्या कुठल्याही प्रकारे लाभ मिळत नाही यासाठी गावातील ग्रामस्थ यांनी इंदापूर गटवि.कास अधिकारी यांच्याकडे वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात तक्रार करूनही अद्याप रेडा गावातील ग्रामसेवकयांच्यावर कुठल्या प्रकारची गट विकास अधिकारी यांच्याकडून विचारणा अथवा कार्यवाही झालेली दिसून येत नाही.

 गावात ऑगस्ट  2020 मध्ये ग्रामपंचायत कार्यकारी संचालक मंडळ बरखास्त झाली व प्रशासक आणि ग्रामसेवक यांच्यामार्फत कामकाज सुरू झाली. ऑगस्ट दोन हजार वीस पासून ते निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत आणि आज अखेरपर्यंत ग्रामसेवक गावात गैरहजर राहिल्याने ग्रामपंचायत कर वसुली तसेच दिवाबत्ती व पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यासाठी गावातील सुज्ञ नागरिक यांनी गटविकास अधिकारी यांना ग्रामसेवक बाबत अनेक प्रकारे माहिती देऊनही ग्रामसेवक वर कुठल्या प्रकारचे कामकाजाबाबत बंधन न घातल्याने रेडा गावातील ग्रामस्थ गट विकास अधिकारी यांच्यावर संताप व्यक्त करीत आहेत.

 याबाबत गट विकास अधिकारी यांना छेडले असता ते म्हणाले की सदरचे ग्रामसेवक यांना गावात राहून ग्रामस्थांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत तरीही ग्रामसेवक गावात गैरहजर राहिल्यास जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या अधीन राहून योग्य ती कारवाई केली जाईल असे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले.


 
Top