उस्मानाबाद : येथील मेघमल्हार सभागृहात श्री शाहूराज घोगरे लिखित "आयुष्याच्या मैदानावर" या आत्मकथनपर ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी वरील उद्गार काढले. मराठवाडा साहित्य परिषद शाखा उस्मानाबादच्या वतीने व मुक्तरंग प्रकाशन लातूर द्वारा प्रकाशित "आयुष्याच्या मैदानावर " या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा  डॉ. विजयकुमार फड यांच्या शुभहस्ते आयोजित केला होता.

 प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पुढे बोलताना डॉ. विजयकुमार फड यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत आपले विचार मांडले. माणसाला जगताना लिहिणे आणि वाचणे किती गरजेचे आहे, तसेच वर्तमानात माणुसकीची जाणीव माणसामाणसात निर्माण होण्यासाठी लिहिते होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक संत वचनांच्या आधारे त्यांनी आपल्या विचारातून बहुमुल्य मार्गदर्शन केले. 

प्रमुख उपस्थिती मध्ये बोलताना प्रा. डॉ.  चंद्रजित जाधव यांनी श्री खोगरे सरांचे आणि त्यांचे गुरू शिष्याचे नाते सांगून सभागृहाला भावनिक करून सोडले तर माधव गरड यांनी आपल्या विचारातून प्रस्तुत ग्रंथ ग्रंथाचे अंतरंग बहिरंग उलगडून दाखविले. ग्रंथाची प्रस्तावना लिहिणारे व कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे प्रा.डॉ.  शिवाजीराव देशमुख यांनी खोगरे यांच्या अनुभवकथनातील जिवंतपणावर नेमकेपणाने बोट ठेवले आणि घटना, प्रसंगातून श्री खोगरे यांच्या लिखाणातील प्रामाणिकपणा कसा उद्धृत होतो ते त्यांनी स्पष्ट केले.

याच प्रसंगी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे ,भास्कर चंदनशिव, डॉ. प्रल्हाद लुलेकर, श्रीमती कमलताई नलावडे व सौ. वंदना कुलकर्णी यांनीही कार्यक्रमाला आवर्जून शुभेच्छा पाठविल्या. या वेळी अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू कुमारी सारिका काळे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म सा प उस्मानाबाद चे अध्यक्ष श्री नितीन तावडे होते. कार्यक्रमाला श्री खोगरे कुटुंबीय शहरातील साहित्यिक म सा प पदाधिकारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

प्रस्तुत पुस्तकाच्या निर्मितीसाठी व प्रकाशन सोहळा  संपन्न करण्यासाठी श्री श्रीमंत सुरवसे, श्री हनुमंत लाटे, श्री दिनकर पाटील ,श्री भालचंद्र जाधव, श्री रवी निंबाळकर, श्री विजय यादव तसेच ज्ञात-अज्ञात अनेकांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री भा.न. शेळके यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी व आभार प्रा. डॉ.  रुपेशकुमार जावळे  यांनी मानले.

 
Top