तुळजापूर : संदीप अरुणराव अमृतराव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या वतीने व्यवस्थापनशास्त्र विषयात पीएच. डी. प्रदान करण्यात आली. संदीप अमृतराव यांनी डॉ. संजय अस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली "अ क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ आयटी एम्प्लोयीज अँड देअर यूज ऑफ मॅनेजमेंट स्किल इन द प्रोफेशनल अँड पर्सनल लाईफ" या विषयाचा प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता.
संशोधनात पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः पुणे येथील आयटी इंड्रस्टी मध्ये काम करणारे कर्मचारी व्यवस्थापन कौशल्याचा त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात कसा उपयोग करतात याचा चिकीत्सक अभ्यास करण्यात आला आहे. संदीप अमृतराव हे मागील ९ वर्ष्यापासून आय टी क्षेत्रात आहेत. बंगलोर व हैद्राबाद येथे त्यांनी कार्य केले असून सध्या पुणे येथील नामांकित आयटी कंपनी टी सी एस मध्ये कार्यरत आहेत. कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत राहून संशोधनाची आवड असल्याने संदीप अमृतराव यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केल्याने अमृतराव- कदम परिवाराचे प्रमुख श्री. दुर्गदास बप्पा अमृतराव, श्री. अरुणराव अमृतराव, डॉ. जयसिंग देशमुख, प्रा. संभाजी भोसले, डॉ. अर्षद रजवी, डॉ. आनंद मुळे, श्री. अभिजीत देशमुख, श्री. देवा नायकल यांनी अभिनंदन केले. तसेच एकाच परिवारातील डॉ. संदीप व डॉ. सुयोग या दोन्ही बंधूनी पीएच. डी. प्राप्त केल्याने कार्पोरेट व विविध क्षेत्रातील व्यक्तीं त्यांचे कौतुक करत आहेत.