तुळजापूर, दि. 31 : सतीश महामुनी

रक्तदान केल्यामुळे आपले शरीर सुदृढ राहते याला शास्त्रीय आधार आहे त्यामुळे सर्वांनी रक्तदान सातत्याने केले पाहिजे असे आवाहन रोटरी क्लब तुळजापूर अध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती नळेगावकर यांनी केले.

तुळजापूर रोटरी क्लब च्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरासाठी सोलापूर येथील हेडगेवार रक्तपेढी रक्त संकलन करण्यासाठी आलेली होती या शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वाती नळेगावकर आणि सचिव रामचंद्र गिड्डे यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी हेडगेवार रक्तपेढीचे संचालक महेंद्र कावरे, रोटरीचे पदाधिकारी भरत जाधव, संजय जाधव, अनिल रोजकरी, सुधीर शेळके, सौ निर्मला जाधव , श्रीमती मीना सोमाजी, गुलचंद व्यवहारे, प्रशांत भागवत, रवी पाटील आणि हेडगेवार रक्तपेढी चे अधिकारी डॉक्टर हरिश्चंद्र गालीमाल यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी रोटरी अध्यक्ष स्वाती नळेगावकर यांनी ७८   वेळा रक्तदान करणारे प्रशांत भागवत व ५१  वेळा रक्तदान करणारे रवींद्र पाटील यांचा सत्कार केला, तुळजापूर शहरामध्ये रोटरी क्लबच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबीर आणि इतर आयोजित होणाऱ्या सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग असतो त्यामुळे आज ७८ नागरिकांनी रक्तदान करून रोटरी ची परंपरा कायम ठेवल्याचे सांगितले.

रोटरीचे सचिव उद्योजक रामचंद्र गिड्डे यांनी आज रक्ताची गरज लक्षात घेऊन रोटरी क्लबने शिबिर घेण्याचे आयोजन केले आणि त्याला रोटरी वर सुद्धा असणाऱ्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

 
Top