अणदूर, दि.३१ : 
 अणदूर ता. तुळजापूर येथे  नुकतेच शाळकरी मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडल्याने  या  अत्याचाराचा निषेध करण्यासाठी व पिडितेला न्याय मिळावे ,  त्याचबरोबर  आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून रविवार दि.३१ रोजी गाव बंद ठेवून गावातून रॅली काढून निषेध सभा घेण्यात आली. 

गावातील बाजार मैदानावर सभा घेत घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी. दीपक आलुरे, साहेबराव घुगे,माणिक आलूरे,दीपक घोडके,सिद्रामप्पा नरे,अरविंद घोडके, बसवराज नरे,राजेश देवशिंगकर आदींनी आपल्या भावना व्यक्त करताना तिन्ही आरोपींना तात्काळ कारवाई व्हावी,फरारी असलेल्या आरोपीला तात्काळ अटक करावी,या प्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांनी नियुक्ती करावी व खटला फासट्रक कोर्टात चालवावा आदी मागण्या मांडल्या.

फरारी आरोपी तात्काळ अटक करावी अन्यथा दि.२ रोजी नळदुर्ग पोलीस ठाणे येथे उपोषणाला बसणार असल्याचे पोलीस निरीक्षक नळदुर्ग यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

यावेळी घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याने गावात मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आले आहे.गावात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून गावकऱ्यांनी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवले.
 
Top