किलज, दि.३१:
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे दि.३१ जानेवारी रोजी अयोद्धा येथे बांधण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी निधी संकलनासाठी गावातून शोभायात्रा काढण्यात आली.
दिंडीचा शुभारंभ गावातील श्री. विठल रुक्मिणी मंदिर येथून करण्यात आला .यामध्ये गावातील भजनी मंडळ आणि तरूणवर्ग मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. या दिंडीच्या माध्यमातून लोकांना आपल्या माध्यमातून शक्यतो आर्थिक स्वरूपातील मदत श्रीराम मंदिराच्या बांधणीसाठी सर्वानी द्यावी असे सांगण्यात आले.
किलज गावाला प्रदक्षिणा घालून या दिंडीचा समारोप गावातील विठल रुक्मिणी मंदीर येथे झाला.