अचलेर : जय गायकवाड
पोलिओ हा मज्जासंस्थेवर परिणाम करणारा आजार असून त्यामुळे गंभीर आजार अर्धांगवायू,किंवा मृत्यु देखील होऊ शकतो.
आणि त्यामुळेच देशात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी पद्धतीने राबविण्यात येत आहे.याचे फलित म्हणून सन १९९९ पासून देशात पोलिओ रुग्णाच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे.
पोलिओचा रोगप्रसार हा प्रामुख्याने अस्वच्छतेमुळे,दूषित मैलापाण्याच्या संपर्कामुळे होतो.
८० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण हे वयाची तीन वर्षे पूर्ण होण्याआधी आढळतात.
त्यामुळेच पोलिओ लसीकरण हे अत्यंत गरजेचे आहे.
आज ३१ डिसेंबर रोजी लोहारा तालुक्यातील अचलेर येथे तीन ठिकाणी पोलिओ बूथ चे नियोजन करण्यात आले होते.याचे उद्घाटन सरपंच प्रकाश लोखंडे व सामाजिक कार्यकर्ते मल्लिनाथ आष्टगे यांच्या हस्ते करण्यात आले.
० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला.
कोरोना रोगाचे नियंत्रण म्हणून मास्क बंधनकारक करून या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी आष्टा(कासार)प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मेडिकल ऑफिसर डॉ.आर.एस.माने,सौ. जाधव सी.एम.(एल.एच.व्ही.)यांनी भेट देऊन पाहणी केली.
ही लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी बनसगोळे ए.एस.(आरोग्य सेविका),सौ.गावडे एस.के.,सौ.राजश्री माशाळकर, सौ.जिजाबाई चव्हाण,मल्लमा धत्तूरगे,सौ.लक्ष्मीबाई कांबळे,सौ. रेखा राठोड,विमल आष्टगे या आशा कार्यकर्त्यानी आपले कर्तव्य बजावले...!!!