काटी : उमाजी गायकवाड
येथील रूक्मिणी फाऊंडेशन्स मार्फत दिला जाणारा "रूक्मिणी महिला विशेष क्रीडा पुरस्कार(2020)या वर्षी आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शक,स्पोर्टस् क्वीन,स्पोर्टस् गुरू,सौ.अंजली मंजुनाथ वरटी(एम ए.एम पी एड.सुवर्ण पदक)मुंबई यांना मान्यवरांचे उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाचे(26 जानेवारी)औचित्य साधून आचार्य अत्रे सभागृह,पिंपरी येथे प्रदान करण्यात आला.
काटी येथील कुलस्वामिणी सुतगिरणीचे मा.संचालक सुर्यभान हंगरकर,प्रा.अभिमान हंगरकर,गोदन वडणे,विजया शितोळे,शामल शिंदे यांच्या मातोश्री कै.रूक्मिणी हंगरकर यांच्या स्मरणार्थ रूक्मिणी फाऊंडेशन्स मार्फत या वर्षापासून गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार देण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारिरीक शिक्षण शिक्षक महामंडळ,पिंपरी चिंचवड शहर यांनी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.
या सोहळ्यात गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार(20-21)प्रदान करण्यात आले.या पैकीच एक पुरस्कार रूक्मिणी फाऊंडेशन्स,उस्मानाबाद मार्फत दिला जाणारा"रूक्मिणी महिला विशेष क्रीडा पुरस्कार सौ.अंजली वरटी यांना प्रदान करण्यात आला.निवड समितीने अंजली यांची निवड त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत केलेले भारतीय संघाचे प्रतिनिधित्व विचारात घेतले.अंजली यांनी भारताकडून 13 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, एशिया स्पर्धेत सहभाग, लंडन, मलेशिया, हाँगकाँग, बँकाॅक, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आदी देशात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद, बास्केटबॉल, हॅन्डबाॅल, फुटबॉल, साॅप्टबाॅल या खेळात प्राविण्य प्राप्त केले असून सध्या अंजली वरटी सेंट्रल रेल्वे(मुंबई) येथे कार्यरत आहेत.
या गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार सोहळ्यास पुणे विभाग क्रीडा उपसंचालक विजय संतान,महापौर माई ढोरे,क्रीडा सभापती प्रा.उत्तम केंदळे,माजी उपमहापौर मोहंमद भाई पानसरे,महामंडळ अध्यक्ष फिरोज शेख,संस्थापक निवृत्ती काळभोर,सचिव महादेव फपाळ,रोप स्किपींग च्या उपाध्यक्षा तथा रूक्मिणी फाऊंडेशन्सच्या संचालिका सौ.शामल माणिकराव शिंदे,महामंडळाचे सर्व पदाधिकारी,क्रीडाशिक्षक,खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.