नळदुर्ग ,दि. ३०,
येथील नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने शुक्रवार दि.२९ जानेवारी रोजी पार सामुदायिक विवाह सोहळ्यात नऊ जोडप्यांचे विवाह येथील बि.के फंक्शन हॉल येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पासुन बचावासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनेचे पालन करीत वधु वरांच्या जवळच्या मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि इज्तेमाई शादीयाॅ (सामुदायिक विवाह सोहळा)चे आयोजन करण्यात आले होते. नळदुर्ग एज्युकेशन असोसिएशनच्या वतीने गेल्या ६ वर्षा पासून नळदुर्ग येथे मुस्लिम समाजासाठी (इज्तेमाई शादीयाॅ) सोहळ्याचे आयोजन करीत आहे.
नळदुर्ग एज्युकेशन असोसिएशनच्या या कार्यामुळे नळदुर्ग शहर व परिसरातील गोरगरीब गरजुवंत कुटुंबीयांना मोठ्या प्रमाणात आधार मिळत आहे. गेल्या ६ वर्षात ७० पेक्षा जास्त जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. २९ जानेवारी रोजी झालेल्या विवाह सोहळ्यात ९ जोडपे विवाहबद्ध झाले.
विवाहबध्द झालेल्या नव वधुवरांना नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रत्येकी २५ हजार रपयांचे संसारोपयोगी वस्तु भेट म्हणून देण्यात आले.हा विवाह सोहळा यशस्वी पार पाडण्याकरिता नळदुर्ग एज्युकेशन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष पत्रकार लतीफ शेख यांच्यासह रुकनोद्दीन शेख, युनुस शेख, अफरोज पंचभाई, बरकत जाहगिरदार, ॲड.मतीन बाडेवाले आमेर शेख, खालेद इनामदार, सादेक काझी, वसीम कुरेशी, आबेद इनामदार, अलीम शेख, अशपाक कुरेशी, वाजीद शेख, रफिक फुलारी, सज्जाद सावकार,सैफन शेख, रहेमान कुरेशी, शौकत कुरेशी, अबुबकर कुरेशी, मिन्हाजोद्दीन इनामदार, रब्बानी शेख, मुर्तुजा शेख, फकरोद्दीन मुजावर, दस्तगीर जाहगिरदार, शमा काझी, जावेद कुरेशी,सलाम कुरेशी, हुजुर शेख, मुर्तुजा मोजन , फुरखान शेख, खमर कुरेशी,जमीर मोजन, सरफराज बागवान, मजीब मोजन, आवेज शेख, आबेद इनामदार, सज्जाद इनामदार, आसीम जाहगिरदार, मुद्दसर शेख,फैसल पठाण, गौस इनामदार,मोईन जमादार,सलमान कुरेशी, सादिक बागवान, आसिफ बागवान, अब्दुल कदीर शेख, करीम इनामदार आवेज पटेल, मुज्जमिल शेख, दानिश शेख,मिनहाज नदाफ यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीचे प्रमुख अलहाज सय्यद नादेरउल्ला हुसेनी व उस्मानाबाद येथुन आलेले त्यांचे सहकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.यावेळी हाफेज व खारी सय्यद मैनोद्दीन जाहगिरदार व आलेम मोहम्मद रजा यांचे धार्मिक प्रवचन झाले.तसेच हफेज फुरखान अहेमद नक्शबंदी यांचे नातचे कार्यक्रम झाले.यावेळी हाफेज सय्यद नियामतुल्ला इनामदार आलेम अब्दुल हाई,हाफेज फारुख शेख,हाफेज मुसा जमादार, मुफ्ती कासीम इनामदार, हाफेज इम्रान शेख, हाफेज शब्बीर शेख,हाफेज खादर इनामदार यांच्यासह
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या सूचनेचे पालन करीत वधु वरांच्या जवळच्या काही नातेवाईकाच्या उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.