वागदरी,दि.३०: 
नळदुर्ग येथे रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले)शहर शाखा नळदुर्ग च्या वतीने नगरसेवक दयानंद बनसोडे , रिपाइंचे तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.

  नळदुर्ग नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विषय समितीच्या सभापती पदी येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा नगरसेवक दयानंद बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल तर रिपाइंचे तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे याना रिपाइं जिल्हा शाखेच्या वतीने दि ग्रेट कार्यकर्ता सन्मान पुरस्कार मिळाल्या बद्दल रिपाइं नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने  सत्कार करण्यात आला.


   याप्रसंगी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, तालुका संघटक सुरेख लोंढे, रिपाइं अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिद  कुरेशी,  शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे, नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे ,जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठल  बनसोडे,मनोहर डावरे, दिपक डावरे, मारूती लोंढे, बबलु जहागीरदार,हरी पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top