तुळजापूर : सतीश महामुनी
हिंदुराष्ट्र सेना तुळजापूर तालुक्याच्या वतीने शहरातून पायी फेरी काढून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धाराशिव व संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या नामांतर च्या मागणीचे निवेदन तहसील कार्यालय मार्फत देण्यात आले.
आजचे शासकीय नाव हे उस्मानाबाद आहे हे नाव पारतंत्र्याची निशाणी असून हा भारतीयांवर गुलामीचा डाग आहे, त्यामुळे धाराशिव नाव करून सरकारने स्वतंत्र भारतात आपण आहोत याची प्रचिती द्यावी मावजीनाथ महाराज यांनी या निमित्ताने केली आहे.
सदर निवेदनामध्ये क्रूर अत्याचारक औरंगजेबाचे नाव काढून टाकून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे नाव औरंगाबाद जिल्ह्यास सन्मानाने देऊन सर्व राजकीय पक्षांनी आपला छत्रपतींच्या विचाराचा वारसा तोंडी न बोलता खरोखर जपून दाखवण्यात यावा असंही या निवेदनात म्हंटले आहे.
यापूर्वीही संघटनेच्या वतीने निवेदन देऊन देखील सरकारने दखल न घेतल्यामुळे पुनःश्च एकदा निवेदन देण्यात आल्याचे यावेळी हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी म्हणाले, व आता दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदुराष्ट्र सेना च्या माध्यमातून देण्यात आला आहे. यानिमित्ताने तुळजापूर शहरांमधून हिंदुत्ववादी विचाराच्या नागरिकांनी शांततेच्या मार्गाने शोभायात्रा काढून या विषयाच्या अनुषंगाने तुळजापूर शहरातील नागरिकांत जनजागृती केली.
यावेळी महंत मावजीनाथजी महाराज,महंत व्यंकटअरण्य महाराज, संजय सोनवणे, अर्जुनाप्पा साळुंके, परिक्षित साळुंके, ओंकार पवार, सुधीर कदम, बापुसाहेब नाईकवाडी, शिवाजी बोधले, गुलचंद व्याव्हारे , अजय साळुंके, सागर इंगळे, गणेश जळके, जिवणराजे इंगळे, गिरीश लोहारेकर, दादा भोसले. व शेकडो हिंदुत्ववादी उपस्थित होते.